भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२५-२६
अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास आणि शैक्षणिक भत्ता - पूर्ण माहिती, पात्रता व आवश्यक कागदपत्रे
स्वाधार योजना २०२५-२६ - संपूर्ण माहिती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाने राबवलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती (SC) आणि नवबौध्द प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे आहे.
परभणी जिल्ह्यातील विद्यार्थी या योजनेसाठी HMAS Portal (https://hmas.mahait.org) वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत इयत्ता ११वी, १२वी तसेच त्यानंतरच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता आणि निर्वाह भत्ता मिळतो.
योजनेचे मुख्य फायदे:
- थेट बँक खात्यात रक्कम: आधार लिंक केलेल्या बँक खात्यात DBT द्वारे थेट रक्कम जमा
- शैक्षणिक साहित्य भत्ता: वैद्यकीय/अभियांत्रिकी शाखेसाठी रु. ५,०००/- आणि इतर शाखेसाठी रु. २,०००/-
- कोणतीही फी नाही: अर्ज पूर्णपणे मोफत, कोणत्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही
- दिव्यांगांसाठी विशेष सवलत: ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्यांसाठी ३% आरक्षण
- दीर्घकालीन लाभ: सातत् ७-८ वर्षे योजनेचा लाभ घेता येतो
योजनेची प्रस्तावना
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी शासनाने "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना" सुरु केलेली आहे.
या योजनेचा लाभ इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना होतो.
योजनेअंतर्गत मिळणारे लाभ
प्रति विद्यार्थी १० महिन्यांसाठी मिळणारी रक्कम:
| खर्चाची बाब | परभणी जिल्ह्यातील ठिकाणे (इतर जिल्ह्याची ठिकाणे) |
तालुक्याच्या ठिकाणी |
|---|---|---|
| भोजन भत्ता | रु. २५,०००/- | रु. २३,०००/- |
| निवास भत्ता | रु. १२,०००/- | रु. १०,०००/- |
| निर्वाह भत्ता | रु. ६,०००/- | रु. ५,०००/- |
| एकुण देय रक्कम | रु. ४३,०००/- | रु. ३८,०००/- |
भत्त्याचे तपशील:
- भोजन भत्ता: विद्यार्थ्यांच्या दैनंदिन खाण्या-पिण्याच्या खर्चासाठी
- निवास भत्ता: खाजगी वसतिगृह किंवा खोली भाड्यासाठी
- निर्वाह भत्ता: इतर दैनंदिन आवश्यक खर्चासाठी
- शैक्षणिक साहित्य भत्ता: पुस्तके, लेखनसाहित्य इत्यादीसाठी
पात्रतेचे निकष
अ) मुलभूत पात्रता
- विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाचा असावा (जात प्रमाणपत्र बंधनकारक).
- शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेला असावा, परंतु प्रवेश न मिळालेला असावा.
- विद्यार्थ्याचे आधार संलग्न राष्ट्रीयकृत/शेडयूल्ड बँकेत खाते असणे बंधनकारक आहे.
- विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकत आहे, तेथील स्थानिक रहिवाशी नसावा.
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (४०% पेक्षा जास्त) ३% आरक्षण व गुणांची अट ४०% राहील.
ब) शैक्षणिक निकष
- विद्यार्थी इयत्ता ११ वी, १२ वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण (पदविका, पदवी, पदव्युत्तर) घेत असावा.
- मागील वर्षात किमान ५०% गुण (दिव्यांगांसाठी ४०%) असणे अनिवार्य आहे.
- इयत्ता १२ वी नंतरचा अभ्यासक्रम किमान दोन वर्षांचा असावा.
- विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
इतर निकष व अटी
- एका विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त ७ वर्षे (व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ८ वर्षे) या योजनेचा लाभ घेता येईल. कमाल वयोमर्यादा ३० वर्षे.
- अभ्यासक्रम पूर्ण करताना फक्त एकदाच ATKT (एटीकेटी) मधून सूट देण्यात येईल.
- शिक्षणात २ वर्षांपेक्षा जास्त खंड (Gap) असू नये.
- विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
- विद्यार्थ्यास शासकीय वसतिगृह, स्वाधार योजना किंवा विद्यावेतन यापैकी एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
- महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५% असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे - नवीन अर्ज (२०२५-२६)
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:
- विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र
- रहीवासी पुरावा (वय/अधिवासी व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र) या पैकी एक
-
सन २०२४-२५ मधील पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र/फॉर्म नं.१६ (२.५० लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेले)
- यापेक्षा जास्त उत्पन्न असलेले विद्यार्थी अपात्र होतील
- विदयार्थीनी विवाहीत असल्यास पतीच्या उत्पन्नाचा पुरावा तसेच विवाह प्रमाणपत्र
- खाते क्रमांकाशी आधार लिकींगबाबतचा पुरावा (बँकेचा शिक्का असलेली), बँकेचा कॅन्सल चेक, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, विद्यार्थ्यांचे बँक पासबुक झेरॉक्स, विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड ची झेरॉक्स
-
शैक्षणिक कागदपत्रे
- मागील वर्षाची टी.सी. जोडावी (विद्यार्थी जन्म तारीख टीसी नुसार नमुद करावी)
- मागील परिक्षेचे गुणपत्रक (किमान ५०%, दिव्यांग असल्यास किमान ४०% गुण आवश्यक)
-
सन २०२५-२६ प्रवेश कागदपत्रे
- सन २०२५-२६ मध्ये प्रवेशीत असल्याबाबतचे मुळ बोनाफाईड प्रमाणपत्र
- सन २०२५-२६ मध्ये महाविदयालयात प्रवेश घेतल्याबाबतचे प्रवेश पावती
-
खंड प्रमाणपत्र (२ वर्षापेक्षा कमी कालावधीचे)
यापेक्षा जास्त खंड असलेले विद्यार्थी अपात्र होतील
-
स्वंयघोषणापत्रे
- ७/८ वर्षापेक्षा जास्त स्वाधार योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वंयघोषनापत्र
- विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नौकरी किंवा व्यवसाय करत नसलेबाबत चे स्वंयघोषनापत्र
- अर्जामध्ये भरलेली माहिती व अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे खरी व अचुक असलेबाबत स्वंयघोषनापत्र
- शै. वर्ष २०२५-२६ मध्ये विद्यावेतन योजनेचा अर्ज भरला नसल्याचे शपथपत्र (केवळ व्यवसायीक अभ्यासक्रमाकरीता)
-
शासकीय वस्तीगृह व स्थानिक रहिवासी संबंधित कागदपत्रे
- २०२५-२६ मध्ये कोणत्याही शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र
- स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
- विद्यार्थ्यांचे वय १८ वर्षापेक्षा कमी असल्यास वरिल प्रमाणपत्र पालकांनी द्यावेत
-
विदयार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा
- खाजगी वस्तीगृह/भाडेकरारनामा
- घर मालक यांच्या नावाचे विद्युत देयक किंवा घरपट्टी
- घर मालक आधार कार्ड
- दोन साक्षीदार यांचे आधार कार्ड
- भाडे करार कधीपासून कधीपर्यंत आहे त्यावर दिनांक नमुद असावा
- विद्यार्थी अल्पवयीन असल्यावर भाडेकरारनामा पालकांच्या नावे असावा
- Declaration by college for falling under 5km of Municipal corporation limit
- महाविदयालयाचे चालु अभ्यासक्रमाच्या चालु वर्षाच्या पहिल्या तिमाहीची उपस्थिती प्रमाणपत्र (मुळ प्रत)
आवश्यक कागदपत्रे - Renewal अर्ज (२०२५-२६)
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:
- जातीचे प्रमाणपत्र
-
सन 2024-25 मधील पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र/फॉर्म नं.16 (2.50 लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेले)
यापेक्षा जास्त उत्पन्न असलेले विद्यार्थी अपात्र होतील
- विदयार्थीनी विवाहीत असल्यास पतीच्या उत्पन्नाचा पुरावा तसेच विवाह प्रमाणपत्र
- खाते क्रमांकाशी आधार लिकींगबाबतचा पुरावा (बॅकेचा शिक्का असलेली), बॅकेचा कॅन्सल चेक, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, विद्यार्थ्यांचे बँक पासबुक झेरॉक्स, विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड ची झेरॉक्स
- मागील वर्षाचे गुणपत्रक (प्रथम वर्ष/द्वितीय वर्ष/तृतीय वर्ष/चतुर्थ वर्ष)
-
सन 2025-26 प्रवेश कागदपत्रे
- सन 2025-26 मध्ये प्रवेशीत असलेल्याबाबतचे मूळ बोनाफाईड प्रमाणपत्र
- सन 2025-26 मध्ये महाविदयालयात प्रवेश घेतल्याबाबतची प्रवेश पावती (प्रवेश पावती नसल्यास बोनाफाईडवर प्रवेश दिनांक नमुद करावा)
-
स्वंयघोषणापत्रे
- 7/8 वर्षापेक्षा जास्त स्वाधार योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वंयघोषनापत्र
- विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये नौकरी किंवा व्यवसाय करत नसलेबाबत चे स्वंयघोषनापत्र
- अर्जामध्ये भरलेली माहिती व अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे खरी व अचुक असलेबाबत स्वंयघोषनापत्र
- शै. वर्ष 2025-26 मध्ये विद्यावेतन योजनेचा अर्ज भरला नसल्याचे शपथपत्र (केवळ व्यवसायीक अभ्यासक्रमाकरीता)
- मागील वर्षातील रक्कम जमा झाल्याबाबतचे स्टेटमेंट
- विदयार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा (खाजगी वस्तीगृह/भाडेकरारनामा.इ. घर मालक यांच्या नावाचे विद्युत देयक किंवा घरपट्टी व घर मालक आधार कार्ड, दोन साक्षीदार यांचे आधार कार्ड) (भाडे करार कधीपासून कधिपर्यंत आहे त्यावर दिनांक नमुद असावा) (विद्यार्थी अल्पवयीन असल्यावर भाडेकरारनामा पालकांच्या नावे असावा)
- Declaration by college for falling under 5km of Municipal corporation limit
- महाविदयालयाचे चालु अभ्यासक्रमाच्या चालु वर्षाच्या पहिल्या तिमाहीची उपस्थिती प्रमाणपत्र (मुळ प्रत)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
१. स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थी जे इयत्ता ११वी, १२वी किंवा त्यानंतरच्या उच्च शिक्षणात असतील, शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेला, पालकांचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा कमी असेल असे विद्यार्थी पात्र आहेत.
२. स्वाधार योजनेत किती रक्कम मिळते?
जिल्हा ठिकाणी (परभणी शहर) रु. ४३,०००/- आणि तालुका ठिकाणी रु. ३८,०००/- प्रति विद्यार्थी १० महिन्यांसाठी मिळते.
३. स्वाधार योजनेसाठी किती टक्के गुण हवे?
मागील वर्षी किमान ५०% गुण आवश्यक आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (४०% पेक्षा जास्त अपंगत्व) किमान ४०% गुण पुरेसे आहेत.
४. स्वाधार योजनेचा लाभ किती वर्षे घेता येतो?
सामान्य अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त ७ वर्षे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ८ वर्षे या योजनेचा लाभ घेता येतो. कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे.
५. स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
https://hmas.mahait.org या अधिकृत पोर्टलवर जाऊन Registration करा. New 2025-26 निवडा आणि सर्व आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. नंतर हार्ड कॉपी परभणी जिल्हा समाज कल्याण कार्यालयात जमा करा.
६. परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोठे अर्ज जमा करावा?
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजिक न्याय भवन, जयकवाडी वसाहत, करेगाव रोड, परभणी - ४३१४०१ येथे हार्ड कॉपी जमा करावी.