अर्ज करण्याची पद्धत
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२५-२६
स्वाधार योजना ऑनलाइन अर्ज - संपूर्ण माहिती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२५-२६ साठी ऑनलाइन अर्ज भरणे अत्यंत सोपे आहे. या पृष्ठावर अर्ज भरण्याची पायरी-पायरीने संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची यादी मराठीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्ज भरण्यासाठी https://hmas.mahait.org ही अधिकृत वेबसाईट वापरावी. सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवल्यास अर्ज भरण्यास केवळ २५-३० मिनिटे लागतात.
अर्जाचा कालावधी
सुमारे 15-20 मिनिटे
अर्ज पद्धत
ऑनलाइन - कुठूनही, कधीही
अर्ज शुल्क
पूर्णतः विनामूल्य
आवश्यक कागदपत्रे
स्कॅन कॉपी (PDF)
https://hmas.mahait.org
https://hmas.mahait.org या वेबसाईटवर जाऊन नोंदणी (Registration) करा व तुमचा User ID आणि Password तयार करा. नोंदणी करताना तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल ID टाका.
• विद्यमान (Existing/Renewal): ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी या योजनेसाठी अर्ज केला होता व आता पुढील वर्षासाठी नूतनीकरण (Renewal) करत आहेत.
⚠️ महत्वाचे: स्वाधार योजनेस मध्यंतरी अर्ज केला असल्यास (जसे की ११वी किंवा प्रथम वर्षास अर्ज न भरता थेट द्वितीय, तृतीय किंवा चतुर्थ वर्षात भरलेले अर्ज) अशा विद्यार्थ्यांना नुतनीकरण ऐवजी नवीन अर्ज भरणे आवश्यक असेल.
• वैयक्तिक माहिती: नाव, जन्मतारीख, आधार नंबर, मोबाइल इ.
• पत्ता माहिती: कायमचा व सध्याचा पत्ता
• शैक्षणिक माहिती: वर्ग, महाविद्यालय, अभ्यासक्रम कालावधी (२/३/४/५ वर्षे)
• बँक माहिती: खाते क्रमांक, IFSC कोड, शाखा इ.
• पालक माहिती: नाव, व्यवसाय, उत्पन्न इ.
महत्वाच्या सूचना
- सर्व कागदपत्रे स्कॅन करून तयार ठेवा (PDF फॉरमॅट - प्रत्येक फाइल 256 KB पेक्षा कमी असावी)
- बँक खाते क्रमांक व IFSC कोड नीट तपासून भरा
- आधार नंबर बँक खात्याशी संलग्न असावा
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या
- अर्जाची प्रिंट-आउट काढून सुरक्षित ठेवा
- जातीचे प्रमाणपत्र आवश्यक विद्यार्थ्यांचे वैध जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/नवबौध्द प्रवर्गाचे)
- रहिवासी पुरावा आवश्यक वय/अधिवासी व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (यापैकी एक)
- उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक सन २०२४-२५ मधील पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र/फॉर्म नं.१६ (२.५० लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेले) ⚠️ यापेक्षा जास्त उत्पन्न असलेले विद्यार्थी अपात्र होतील
- विवाह प्रमाणपत्र व पती/पत्नीचे उत्पन्न प्रमाणपत्र परिस्थितीजन्य विद्यार्थी विवाहीत असल्यास पती/पत्नीच्या उत्पन्नाचा पुरावा तसेच विवाह प्रमाणपत्र
-
बँक संबंधित कागदपत्रे आवश्यक
• खाते क्रमांकाशी आधार लिंकिंगबाबतचा पुरावा (बँकेचा शिक्का असलेली)
• बँकेचा कॅन्सल चेक
• विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
• विद्यार्थ्यांचे बँक पासबुक झेरॉक्स
• विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड झेरॉक्स - मागील वर्षाची टी.सी. (Transfer Certificate) आवश्यक विद्यार्थ्याची जन्म तारीख टी.सी. नुसार असावी
- मागील परिक्षेचे गुणपत्रक आवश्यक किमान ५०% गुण आवश्यक (दिव्यांग असल्यास किमान ४०% गुण)
- बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक सन २०२५-२६ मध्ये प्रवेशीत असल्याबाबतचे मूळ बोनाफाईड प्रमाणपत्र
- प्रवेश पावती आवश्यक सन २०२५-२६ मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबाबतची प्रवेश पावती
- खंड प्रमाणपत्र परिस्थितीजन्य २ वर्षापेक्षा कमी कालावधीचे खंड प्रमाणपत्र ⚠️ यापेक्षा जास्त खंड असलेले विद्यार्थी अपात्र होतील
-
स्वयंघोषणापत्रे आवश्यक
• ७/८ वर्षापेक्षा जास्त स्वाधार योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र
• विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नोकरी किंवा व्यवसाय करत नसलेबाबतचे स्वयंघोषणापत्र
• अर्जामध्ये भरलेली माहिती व अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे खरी व अचूक असलेबाबत स्वयंघोषणापत्र - शपथपत्र (व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी) परिस्थितीजन्य शै. वर्ष २०२५-२६ मध्ये विद्यावेतन योजनेचा अर्ज भरला नसल्याचे शपथपत्र (केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता)
- शपथपत्र (वसतीगृह संबंधित) आवश्यक २०२५-२६ मध्ये कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र
- स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक महाविद्यालयाच्या शहरातील/तालुक्यातील स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र 📌 विद्यार्थ्यांचे वय १८ वर्षापेक्षा कमी असल्यास वरील प्रमाणपत्र पालकांनी द्यावेत
-
राहत्या जागेचा पुरावा आवश्यक
विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा:
• खाजगी वसतीगृह प्रमाणपत्र किंवा
• भाडेकरारनामा (कधीपासून कधीपर्यंत आहे त्यावर दिनांक नमूद असावा)
• घर मालकाच्या नावाचे विद्युत देयक किंवा घरपट्टी
• घर मालकाचे आधार कार्ड
• दोन साक्षीदारांचे आधार कार्ड 📌 विद्यार्थी अल्पवयीन असल्यावर भाडेकरारनामा पालकांच्या नावे असावा - महानगरपालिका हद्द घोषणापत्र परिस्थितीजन्य महाविद्यालय महानगरपालीका हद्दीत किंवा महानगरपालीका ह्दीपासून 5 कि.मी अंतरापर्यंत असलेबाबत प्रमाणपत्र(जिल्हा/महानगरपालीका स्तरावरील महाविद्यालयाकरीता)
- महाविद्यालय नगरपालीका किंवा नगरपरिषदेच्या हद्दीत असलेबाबत प्रमाणपत्र(तालुका स्तरावरील महाविद्यालयाकरीता)
- उपस्थिती प्रमाणपत्र आवश्यक महाविद्यालयाचे चालू अभ्यासक्रमाच्या चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीची उपस्थिती प्रमाणपत्र (मूळ प्रत)
- जातीचे प्रमाणपत्र आवश्यक विद्यार्थ्यांचे वैध जातीचे प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक सन २०२४-२५ मधील पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र/फॉर्म नं.१६ (२.५० लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेले) ⚠️ यापेक्षा जास्त उत्पन्न असलेले विद्यार्थी अपात्र होतील
- विवाह प्रमाणपत्र व पती/पत्नीचे उत्पन्न प्रमाणपत्र परिस्थितीजन्य विद्यार्थी विवाहीत असल्यास पती/पत्नीच्या उत्पन्नाचा पुरावा तसेच विवाह प्रमाणपत्र
-
बँक संबंधित कागदपत्रे आवश्यक
• खाते क्रमांकाशी आधार लिंकिंगबाबतचा पुरावा (बँकेचा शिक्का असलेली)
• बँकेचा कॅन्सल चेक
• विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
• विद्यार्थ्यांचे बँक पासबुक झेरॉक्स
• विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड झेरॉक्स - मागील वर्षाचे गुणपत्रक आवश्यक प्रथम वर्ष/द्वितीय वर्ष/तृतीय वर्ष/चतुर्थ वर्ष - मागील वर्षाचे गुणपत्रक (उत्तीर्ण असावे)
- बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक सन २०२५-२६ मध्ये प्रवेशीत असल्याबाबतचे मूळ बोनाफाईड प्रमाणपत्र
- प्रवेश पावती आवश्यक सन २०२५-२६ मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबाबतची प्रवेश पावती 📌 प्रवेश पावती नसल्यास बोनाफाईडवर प्रवेश दिनांक नमूद करावा
-
स्वयंघोषणापत्रे आवश्यक
• ७/८ वर्षापेक्षा जास्त स्वाधार योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र
• विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नोकरी किंवा व्यवसाय करत नसलेबाबतचे स्वयंघोषणापत्र
• अर्जामध्ये भरलेली माहिती व अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे खरी व अचूक असलेबाबत स्वयंघोषणापत्र - शपथपत्र (व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी) परिस्थितीजन्य शै. वर्ष २०२५-२६ मध्ये विद्यावेतन योजनेचा अर्ज भरला नसल्याचे शपथपत्र (केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता)
- मागील वर्षातील रक्कम जमा झाल्याबाबतचे स्टेटमेंट आवश्यक मागील वर्षी स्वाधार योजनेची रक्कम बँक खात्यात जमा झाल्याबाबतचे बँक स्टेटमेंट
-
राहत्या जागेचा पुरावा आवश्यक
विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा:
• खाजगी वसतीगृह प्रमाणपत्र किंवा
• भाडेकरारनामा (कधीपासून कधीपर्यंत आहे त्यावर दिनांक नमूद असावा)
• घर मालकाच्या नावाचे विद्युत देयक किंवा घरपट्टी
• घर मालकाचे आधार कार्ड
• दोन साक्षीदारांचे आधार कार्ड 📌 विद्यार्थी अल्पवयीन असल्यावर भाडेकरारनामा पालकांच्या नावे असावा - महानगरपालिका हद्द घोषणापत्र परिस्थितीजन्य
- महाविद्यालय महानगरपालीका हद्दीत किंवा महानगरपालीका ह्दीपासून 5 कि.मी अंतरापर्यंत असलेबाबत प्रमाणपत्र(जिल्हा/महानगरपालीका स्तरावरील महाविद्यालयाकरीता)
- महाविद्यालय नगरपालीका किंवा नगरपरिषदेच्या हद्दीत असलेबाबत प्रमाणपत्र(तालुका स्तरावरील महाविद्यालयाकरीता)
- उपस्थिती प्रमाणपत्र आवश्यक महाविद्यालयाचे चालू अभ्यासक्रमाच्या चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीची उपस्थिती प्रमाणपत्र (मूळ प्रत)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
१. स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कुठे करावा?
स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन अर्ज https://hmas.mahait.org या अधिकृत महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर करावा. इतर कोणत्याही वेबसाईटवर अर्ज करू नये.
२. अर्ज भरण्यासाठी किती वेळ लागतो?
सर्व आवश्यक कागदपत्रे तयार असल्यास अर्ज भरण्यास सुमारे 15-20 मिनिटे लागतात. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी अतिरिक्त वेळ लागू शकतो.
३. नवीन आणि नूतनीकरण अर्जात काय फरक आहे?
नवीन (New): जे विद्यार्थी पहिल्यांदा स्वाधार योजनेसाठी अर्ज करत आहेत किंवा मध्यंतरी अर्ज करत आहेत. नूतनीकरण (Renewal): ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी या योजनेसाठी अर्ज केला होता आणि सलग पुढील वर्षासाठी नूतनीकरण करत आहेत.
४. मध्यंतरी अर्ज म्हणजे काय?
११वी किंवा प्रथम वर्षास अर्ज न भरता थेट द्वितीय, तृतीय किंवा चतुर्थ वर्षात भरलेला अर्ज हा मध्यंतरी अर्ज म्हणून ओळखला जातो. अशा विद्यार्थ्यांना नूतनीकरण ऐवजी नवीन अर्ज भरणे आवश्यक आहे.
५. कागदपत्रे अपलोड करताना कोणते फॉरमॅट वापरावे?
PDF फॉरमॅट वापरावे. प्रत्येक फाइल साइज 256 KB पेक्षा कमी असावी.
६. आधार नंबर बँकेशी जोडलेला नसेल तर?
आधार नंबर बँक खात्याशी संलग्न करणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यापूर्वी आपल्या बँकेत जाऊन आधार नंबर खात्याशी लिंक करा आणि त्याचा पुरावा घ्या.
७. उत्पन्न प्रमाणपत्र कोणत्या वर्षाचे असावे?
सन २०२४-२५ मधील पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फॉर्म नं.१६ असावे. उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त असल्यास विद्यार्थी अपात्र होतील.
८. भाडेकरारनामा कोणत्या नावे असावा?
विद्यार्थी १८ वर्षांपेक्षा जास्त असल्यास त्याच्या/तिच्या नावे असावा. विद्यार्थी अल्पवयीन (१८ वर्षांपेक्षा कमी) असल्यावर भाडेकरारनामा पालकांच्या नावे असावा.
९. नूतनीकरण अर्जासाठी कोणती अतिरिक्त कागदपत्रे लागतात?
नूतनीकरण अर्जासाठी मागील वर्षातील स्वाधार योजनेची रक्कम बँक खात्यात जमा झाल्याबाबतचे बँक स्टेटमेंट आवश्यक असते. इतर सर्व कागदपत्रे अपडेट केलेली असावीत.
१०. अर्ज सबमिट केल्यानंतर हार्ड कॉपी कुठे जमा करावी?
अर्जाची प्रिंट-आउट घेऊन सर्व आवश्यक कागदपत्रांच्या हार्ड कॉपीसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, परभणी (जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी - ४३१४०१) येथे जमा करावी.
११. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अतिरिक्त कागदपत्र काय आहे?
व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता शै. वर्ष २०२५-२६ मध्ये विद्यावेतन योजनेचा अर्ज भरला नसल्याचे शपथपत्र आवश्यक आहे.